Skip to main content

Posts

Showing posts from December, 2012

अथांग शांतता

ती अनाथ मुले थांबलेली, आकाशाकडे हाथ पसरून, चेहऱ्यावर अश्रू सुकलेली, आणि पसरलेली अथांग शांतता.  अर्ध्या सारणात रचलेला मृत भाऊ,  आणि शोधूनही न सापडलेला तो बापाची शोकांतिका, आणि डोळे असूनहि न पाहणारी देशाची जनता, आणि पसरलेली अथांग शांतता.  यात कसले शुरपण? यात कसले देवपण? फक्त दुख आणि दुख आणि  आणि पसरलेली अथांग शांतता.  दुरुस्ती पलीकडे जळालेली घरे,  मृत देहाचा वास हवेत चहु कडे, रडून अर्धवट मेलेली ती स्त्री, तुटलेल्या बांगड्या इकडे तिकडे, आणि पसरलेली अथांग शांतता.  आकाशात विजय कंदिलाचा प्रकाश,  आता कोण मारणार, पाहतात डोळे वाट, भीतीने थर  थर कापणारा त्या मुलांचा हात, आणि पसरलेली अथांग शांतता.  सैनिक हरली आणि हार त्यांनी मानली, बायकांची इज्जत बलात्कारात लुटली, तिला कापली, तोडली, आणि ती संपली, आणि येणारी पिढी द्वेषात डुबली. यात कसले शुरपण? यात कसले देवपण? फक्त दुख आणि दुख आणि  आणि पसरलेली अथांग शांतता. 

अशी वेळ नेहमीच येते...

अशी वेळ नेहमीच येते... आज परत दुसऱ्यांसाठी जगण्याची वेळ आली आहे. स्वतःच्या स्वप्नांना हसत-हसत,  वाळूसारखे हातातून निसट ताना पाहण्याची वेळ आली आहे. स्वार्थी मनातून निस्वर्थाता वाहण्याची  वेळ आली आहे. आज परत दुसऱ्यांसाठी जगण्याची वेळ आली आहे. अशी वेळ नेहमीच येते, जेव्हा मी स्वप्न पाहतो आणि ते पूर्णत्वाच्या मार्गावर असतात, हि वेळ तेव्हाच येते ... आणि मग मनासमोर, यक्ष प्रश्न असा उभा ... परीक्षेतील प्रश्न असते तर सोडविले हि असते. न थांबता, न बोलता आणि झटपट. त्या प्रश्नांची कधी हि हिम्मत झाली नाही,  मला थांबवण्याची, मला विचार करायला लावण्याची  किंवा मला चल बिचालित करण्याची . मात्र, हा प्रश्न नेहमीच मला गोंधळवून टाकतो ... स्वतासाठी कि  दुसऱ्यांसाठी? अशी वेळ नेहमीच येते.  अशी वेळ नेहमीच येते .. आणि सर्व काही घेवून जाते .. हाथ मात्र मोकळाच राहतो ...