अशी वेळ नेहमीच येते...
स्वतःच्या स्वप्नांना हसत-हसत,
वाळूसारखे हातातून निसट ताना पाहण्याची वेळ आली आहे.
स्वार्थी मनातून निस्वर्थाता वाहण्याची वेळ आली आहे.
आज परत दुसऱ्यांसाठी जगण्याची वेळ आली आहे.
अशी वेळ नेहमीच येते,
जेव्हा मी स्वप्न पाहतो आणि ते पूर्णत्वाच्या मार्गावर असतात,
हि वेळ तेव्हाच येते ...
आणि मग मनासमोर, यक्ष प्रश्न असा उभा ...
परीक्षेतील प्रश्न असते तर सोडविले हि असते.
न थांबता, न बोलता आणि झटपट.
त्या प्रश्नांची कधी हि हिम्मत झाली नाही,
मला थांबवण्याची, मला विचार करायला लावण्याची
किंवा मला चल बिचालित करण्याची .
मात्र, हा प्रश्न नेहमीच मला गोंधळवून टाकतो ...
स्वतासाठी कि दुसऱ्यांसाठी?
अशी वेळ नेहमीच येते.
अशी वेळ नेहमीच येते .. आणि सर्व काही घेवून जाते ..
हाथ मात्र मोकळाच राहतो ...
Comments
Post a Comment