ती अनाथ मुले थांबलेली, आकाशाकडे हाथ पसरून,
चेहऱ्यावर अश्रू सुकलेली, आणि पसरलेली अथांग शांतता.
अर्ध्या सारणात रचलेला मृत भाऊ,
आणि शोधूनही न सापडलेला तो बापाची शोकांतिका,
आणि डोळे असूनहि न पाहणारी देशाची जनता,
आणि पसरलेली अथांग शांतता.
यात कसले शुरपण? यात कसले देवपण?
फक्त दुख आणि दुख आणि आणि पसरलेली अथांग शांतता.
दुरुस्ती पलीकडे जळालेली घरे, मृत देहाचा वास हवेत चहु कडे,
रडून अर्धवट मेलेली ती स्त्री, तुटलेल्या बांगड्या इकडे तिकडे,
आणि पसरलेली अथांग शांतता.
आकाशात विजय कंदिलाचा प्रकाश,
आता कोण मारणार, पाहतात डोळे वाट,
भीतीने थर थर कापणारा त्या मुलांचा हात,
आणि पसरलेली अथांग शांतता.
सैनिक हरली आणि हार त्यांनी मानली,
बायकांची इज्जत बलात्कारात लुटली,
तिला कापली, तोडली, आणि ती संपली,
आणि येणारी पिढी द्वेषात डुबली.
यात कसले शुरपण? यात कसले देवपण?
फक्त दुख आणि दुख आणि आणि पसरलेली अथांग शांतता.
Comments
Post a Comment