Skip to main content

Posts

Showing posts from July, 2012

SOME DIFFERENT RAINS

थोडासा वेगळा पाऊस अचानक आली हवेची लहर, जोरात धावली पावसाची सर, भिजले शाळेचे दप्तर. होणार उशीर शाळेत, जर पोहोचलो नाही वेळेत. का झाला उशीर? सरांच्या प्रश्नांचा मार. हात पुढे करून, त्यावर छडीचा मार. पाउस तू का पडतो? माझ्या सोबत च असा प्रसंग का घडतो? धो-धो पावसाची लाट, आणि त्यात माझा गृहपाठ. माझ्या गळत्या घराची छपर आणि घरात भांडी फक्त आठ. खूपच काही साम्य, माझ्या घर बाहेर आणि घरात. अभ्यास नाही केला? शिक्षकांच्या प्रश्नांचा भडी मार, हात पुढे करून, त्यावर छडीचा मार. पाउस तू का पडतो? माझ्या सोबत च असा प्रसंग का घडतो? पावसामुळे आई-बा च काम सुटलं, "दोन महिन्यांनी या", असं त्यांनी सांगितलं आणि आमच नशीबच फुटलं. रात्रीची तीखट मीठ भाकरी, भुकेला पोटाला साखरे सारखी. "नेहमी गरीबच का?" मनात प्रश्नांचा मार. नशिबाच फाटलं तो पाउस झाला आर-पार पाउस तू माझ्याच नाशिबका पडतो? माझ्या सोबत च असा प्रसंग का घडतो?